अकोट (देवानंद खिरकर)- मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, मा.अपर पोलीस अधीक्षक मा.श्रीमती मोनिका राऊत, मा.सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्रीमती रितू खोखर मॅडम यांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांनी अकोट ग्रामीण भागातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालका विरुध्द कारवाईचा बडगा उगारला आहे. सन 2021 या वर्ष्यात एकूण तब्बल 3,504 / तीन हजार पाचशे चार एवढ्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करून तब्बल 9,89,100 /-रु. ( नऊ लाख, एकोन्नव्हद हजार शंभर रुपये )इतका दंड आकारला आहे.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ग्रामीण भागातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालका विरुध्द कलम मोटर वाहन अधिनियम कलम 66/192 – अवैध प्रवाशी वाहतूक करणे अंतर्गत एकूण – 240 वाहणावर कारवाई केली आहे. तसेच कलम 130(1)/177 – चालक परवाना सोबत न बाळगणे अंतर्गत – 815 कारवाई, कलम 138(3)/177 – वाहन चालवीतांना शीट बेल्ट न लावणे अंतर्गत – 705 कारवाया, कलम 184/177 – धोकादायक रित्या वाहन चालविणे अंतर्गत – 120 कारवाया कलम 108/177 – मालावर माणसे / प्रवाशी बसवून / वाहून नेणे अंतर्गत – 177 कारवाया , कलम 100(2)/177 – वाहनाच्या काचेवर काळी / डार्क फीत लावणे ( ब्लॅक फिल्म ) अंतर्गत 231 कारवाया अश्या विविध कलामान्यवे कारवाई करून सन 2021 या वर्षभरात 3,504 एवढ्या वाहणावर दंडात्मक कारवाई करून तब्बल एका वर्षभरात सुमारे 9,89,100 रु ( नऊ लाख एकोन नव्वद हजार शंभर रुपये) एवढा भर भक्कम कायदेशीर दंड आकारला आहे.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ची ही बॅम्पर कारवाई असून सदर कारवाईचा वाहन चालकाच्या मनात धसका बसला आहे.अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पो. हे. कॉ. पंजाबराव कराळे ब. न. 1561 व पो. कॉ. अमोल लोखंडे ब. न. 2151 हे पो. नि. श्री. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभागाचे काम पाहत असून, वाहन चालकानी वाहतूक नियमाचे अनुशासनात्मक पालन करावे अन्यथा होणाऱ्या कायदेशीर कारवाईस सामोरे जावे असे आव्हान अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांनी केले आहे.