अकोला : अकोला सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी हे रुग्णांना सोबत अतिशय उद्धटपणे वागतात रुग्ण गरीब व आपल्याला होणारा त्रास यामुळे खूप वैतागून गेलेला असतो. अशा वेळी रुग्णांना प्रेमळ भाषा व योग्य उपचार हवे असतात परंतु अकोला सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी हे महिला असो व पुरुष रुग्णां सोबत अतिशय उद्धटपणे वागतात आपली ड्युटी पोस्ट सोडुन एक्स रे रुम ला एक एक तास लॉक लावलेले असतात.
अश्या उध्दटपणे वागणाऱ्या रक्तपेढी, एक्स-रे, सोनोग्राफी, औषधालय मधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या ऑनलाईन तक्रारी द्वारे केली आहे.