अकोला, दि.28: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवार दि.29 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि.29 रोजी सकाळी 10 वा. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 123 व्या जयंती महोत्सवास सदिच्छा भेट, ठिकाण- श्री. शिवाजी विद्यालय, मुख्य शाखा,अकोला, सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन कार्यकारी समिती आढावा सभा, स्थळ- नियोजन भवन, छत्रपती सभागृह, अकोला., दुपारी साडेबारा वा. पालकमंत्री पाणंद रस्ते व स्मशान भुमि शेड बांधकामाचे ऑनलाईन उद्घाटन,स्थळः जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला., दुपारी एक वा. जिल्हा नियोजन समिती आढावा सभा, स्थळः नियोजन भवन, छत्रपती सभागृह., दुपारी चार वा. कोविड 19 मध्ये अनाथ झालेल्या बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण, स्थळः नियोजन भवन, छत्रपती सभागृह., दुपारी चार वा. 20 मि. नी घर कामगारांचे बचतगट स्थापन करण्याबाबत आढावा सभा, स्थळः नियोजन भवन, छत्रपती सभागृह., सायं. पाच वा. 20 मि. नी घरकामगार संबंधित मालक व विविध मालक संघटनांसमवेत निधी उभारणी संदर्भात आढावा सभा, स्थळः नियोजन भवन, छत्रपती सभागृह., सायं. सव्वा सहा वा. शासकीय विश्रामगृह अकोला येथे राखीव व सवडीने दर्यापूर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.