• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राजकारण

‘त्या’ तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा

Our Media by Our Media
December 28, 2021
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
109 1
0
‘त्या’ तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा
30
SHARES
786
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) आणि महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) यांच्यात वारंवार संघर्ष बघायला मिळतोय. विशेष म्हणजे यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन (Assembly Speaker Election) राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय.

राज्य सरकारने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपने (BJP) त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhv Thackeray) यांनी दोनवेळा पत्र पाठवलं.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

पण राज्यपालांनी कायदेशीर गोष्टीचं कारण सांगत निवडणुकीला परवानगी नाकारली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत शब्दांत तिसरं पत्र पाठवलं आहे. त्यावर राज्यपालांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण राज्यपालांसोबतच्या या संघर्षावरुन महाविकास आघाडी सरकार राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकते, असं मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मांडलं आहे.

कायदेतज्ज्ञ उल्हास बापट नेमकं काय म्हणाले? “विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशापद्धतीने घ्यायची हा विधानसभेचा अधिकार आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेत राज्यापालांनी खरंतर हस्तक्षेप करु नये. त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे 163 कलमाअंतर्गत स्वच्छ शब्दांत लिहिलं आहे की, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांनी जो सल्ला दिलेला असतो तो राज्यपालांना बंधनकारक असतो. काही बाबतीत राज्यपालांना आक्षेप घेण्याचा अधिकार आहे.

पण कोणत्या बाबतीत आक्षेप घेऊ शकतात याबाबत राज्यघटनेत नमूद करण्यात आलेलं आहे. आताचा जो विषय आहे तो राज्यपालांच्या आक्षेपाचा भाग नाही. पण दुर्देवाने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून असं नेहमीच होत आलेलं आहे. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळं सरकार असेल तर राज्यपालांचा राजकीय उपयोग केला जातो”, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.

‘कायदे तपासण्याचा अधिकार तुम्हाला नाही’, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र “विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नेमणुकीचा मुद्दा अद्याप रखडलेला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्य पहाटेच्या शपथविधी देखील बेकायदेशीर होता. तसेच सध्याचं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संघर्ष, या प्रकरणांमुळे राज्य सरकार राज्यपालांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे तक्रार करु शकते. किंवा सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतं”, अशी भूमिका उल्हास बापट यांनी मांडली आहे.

“सध्याच्या संघर्षाबाबत तीन गोष्टी करता येतील. पहिली म्हणजे राज्यपालांना पुन्हा विनंती करता येईल. दुसरा मार्ग म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे तक्रार करता येईल. तिसरा पर्याय म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल. राज्यपालांनी अनुमती दिली नाही तरी महाविकास आघाडी सरकारने उद्या निवडणूक घेतली तरी ती वैध ठरणार आहे. कदाचित त्याला सुप्रीम कोर्टात कुणी आव्हान देऊ शकेल. त्यावेळी काय करायचं ते सुप्रीम कोर्ट ठरवेल”, अशी प्रतिक्रिया उल्हास बापट यांनी दिली.

Tags: Bhagatsingh Koshyaricm Uddhav ThackerayGovernor
Previous Post

आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या, पुरस्कारांची 6 जानेवारी पत्रकार दिनी घोषणा

Next Post

कामाठीपुऱ्यातील सेक्सवर्कर मुंबईतून होणार हद्दपार

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
शहरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक

कामाठीपुऱ्यातील सेक्सवर्कर मुंबईतून होणार हद्दपार

Rohini khadse

जळगाव : शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला : रोहिणी खडसेंचा आरोप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.