अकोला: मध्यप्रदेशच्या एका शिव मंदिरात मंत्रमुग्ध होऊन शिव तांडव स्तोत्र म्हणून करोडो शिव भक्तांच्या हृदयाचे ताईत बनणारे अकोल्यातील कालीचरण महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या एका धर्म सभेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानाची एक व्हिडिओ क्लिप सध्या समाज माध्यमात व्हायरल झाल्याने सामाजिक व राजकीय वातावरण ढवळल्या गेले आहे.
कालीचरण महाराज यांनी आपल्या या भाषणात अखंड भारताची फाळणी होवून कसे तुकडे झाले हे सांगत भारत- पाकिस्तान विभाजनाला महात्मा गांधी कारणीभूत असल्याचे म्हंटले. महात्मा गांधीजींना यांना एकेरी भाषेत संबोधून त्यांच्यासाठी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. गांधीजींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना वंदन केले आहे. दरम्यान या वादग्रस्त विधानामुळे कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे कळते.
या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी ट्विट द्वारे कालीचरण महाराजांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून महाराजांवर करावाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संजय निरुपम यांनी देखील ट्विटर वर विडिओ पोस्ट करून निषेध नोंदवून अटकेची मागणी केली आहे.