• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बालगृहातील 71 अनाथ बालकांना मिळाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

Our Media by Our Media
December 22, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
89 1
0
बालगृहातील 71 अनाथ बालकांना मिळाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ
14
SHARES
642
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.22: जिल्ह्यातील बालगृहातील अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले होते. सर्व यंत्रणाच्या समन्वयाने बालगृहातील 71 अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार यांच्या समन्वयातून बालगृहातील अनाथ बालकांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेचा लाभ मिळण्याकरीता बालगृहाला भेटी देवून योजनेचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे जोडावी याबाबतची माहिती दिली. तसेच योजनेबाबतच्या सर्व यंत्रणांशी समन्वय साधुन 71 अनाथ, दुर्धर आजारग्रस्त बालकांचे प्रस्ताव सेतु केंद्रामार्फत दाखल करुन प्रस्तावाला वेळोवेळी पाठपुरावा केला. संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत सुर्याद्य बालगृहांचे 50, गायत्री बालिकाश्रमाचे 14 तर आनंद बालीकाश्रमातील सात बालीका अशा एकूण 71 बालकांना संजय गांधी निराधार योजना लागू करुन बालकांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार रुपये जमा करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर बालगृहातील पाच बालिकाना लाभ देण्यात आला. अनाथ बालिकांना संजय गांधी योजना लागू व्हावी याकरीता संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार घुगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaGandhi Niradhar Yojana
Previous Post

पंतप्रधान मोदींची नक्‍कल करणार्‍या भास्‍कर जाधव यांना निलंबित करा: देवेंद्र फडणवीस

Next Post

शासकीय राज्यगृहातील महिलांचे लसीकरण पूर्ण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vacconation

शासकीय राज्यगृहातील महिलांचे लसीकरण पूर्ण

2consumer_day

24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.