अकोला (पंकज इंगळे): अशोक वाटीकेच्या बाजूला दळण वळण करण्याकरिता आधीच रस्ता आहे. परंतु अशोक वाटीकेच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा रस्त्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे. अशोक वाटिका हे संपुर्ण जिल्ह्याचे धार्मिक स्थळ असून रस्त्याच्या केंद्रस्थानी व दोन्ही बाजूने ये-जा करण्याकरिता रस्ता केल्यास सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाहनांना आपण दोन्ही बाजूने रस्ता झाल्यास थांबवू शकणार नाही. त्यामुळे अशोक वाटीकेमध्ये ये -जा करणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुव्यवस्थितपणे रस्ता सुरळीत पणे पार करता येणार नाही.
कारण रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे असंख्य नागरिकांचा लहान मुलांचा रस्ता ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच महापुरुषाच्या जयंती व उत्सव हे सदर ठिकाणी घेण्याकरिता दुसरी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या काळात रस्ता बंद करून कार्यक्रमाचे आटोजन करावे लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व गोष्टीमुळे प्रशासनास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रस्ता बंद करून कार्यक्रमाचे आयोजन करणे हे चुकीचे ठरणार आहे. ह्याकरिता सदर गांभीर्यपूर्वक बाबीची दखल घेवून यावर काहीतरी उपाययोजना प्रशासनाने तात्काळ करावी व रस्त्याने वाहणाऱ्या भरधाव वाहनांमुळे एखाद्या निरपराध नागरिकांचा जिव जाण्याची श्यकता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सोयीने सदर रस्ता नसून हा नागरिकाकरिता घातक आहे.
करिता तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलनादरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उपाध्यक्ष ब्रम्हानंद प्रधान ह्यांनी इ मेल द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्हाधिकारी अकोला, पोलिस अधीक्षक अकोला ह्यांना देण्यात आले. ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उपाध्यक्ष ब्रम्हानंद प्रधान, युवक अध्यक्ष राहुल इंगळे, हरिष गुडधे, पंकज इंगळे, नितीन इंगळे, आनंद लांजेवार, सोनू शितळे, अवि तेलगोटे आदी सर्व उपस्थित होते.