अकोट (देवानंद खिरकर): अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल श्री. गुरुदेव विद्या मंदिर या शाळेमध्ये 8,9,10 परंत वर्ग आहेत.या शाळेमध्ये असलेले शिक्षक व शिक्षिका ह्या दररोज बाहेर गाव वरून बोर्डी शाळेवर येणे जाणे करतात. वास्तविक पाहता कोरोनाचा पादुर्भाव सुरू असल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे कडक आदेश दिले, असतांना सुध्दा या आदेशाची कुठलीही अंमलबजावणी होतांना दिसत नाही.
गुरुदेव विद्या मंदिर बोर्डी ही शाळा गावाच्या बाहेर आहे. या शाळेमध्ये मागे चोरी सुद्धा झाली होती खिडकी मधील शिका वाकवून चोराने शाळेमधील खोली मध्ये प्रवेश केला होता. या बाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. गुरुदेव विद्या मंदिर ही शाळा गावाच्या बाहेर असल्यामुळे या शाळेला वॉचमन किंवा सी सी टीव्ही कॅमेरेची अत्यंत गरज आहे.तरी वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन, या शाळेमध्ये वॉचमन किव्वा सी सी टीव्ही कॅमेरे लावावे व बाहेर गाव वरून अपडाऊन करीत असलेले शिक्षक व शिक्षिका यांना मुख्यालयी राहण्याचे कडक आदेश द्यावे.