अकोला : गेल्या चाळीस वर्षात आंदोलने करून दहा कायदे केल्यामुळे जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे भ्रष्टाचार संपला असे म्हणता येणार नाही, पण राज्यात आणि देशात कोट्यावधी रुपये खर्च करू नये. जे लोकशिक्षण लोकजागृती झाली नसती ती जागृती झाली हे नाकारता येत नाही असे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे
प्रदेश उपाध्यक्ष तथा विश्वस्त डॉ.प्रा. बालाजी कोपलवार यांनी यावेळी व्यक्त केले.
मंगळवारी अकोला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ची अकोला जिल्हा बैठक झाली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला या संदर्भात मार्गदर्शन करताना प्रा. कोपलवार बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की आज लोक निडर होऊन बोलू लागले आंदोलनासाठी रस्त्यावर येऊ लागले. जेलभरो आंदोलन करू लागले, आता या आंदोलनाला अहिंसेच्या मार्गाने अधिक गती देणे काळाची गरज वाटू लागली असल्याने झालेल्या कायद्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणे आणि लोकायुक्त कायदा करून त्याची अंमलबजावणी करणे यासाठी महाराष्ट्र राज्यात आंदोलन सुरू करण्याचे ठरविले आहे. गेली सहा ते सात वर्षे थांबविले भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे संघटन बांधणी सुरू असून याकरता प्रामाणिक आणि चारित्र्यवान कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे असे ही प्रा. बालाजी कोपरवार यांनी यावेळी आवाहन केले आहे. यावेळी ज्ञानेश्वर धायगुडे हिंगोली जिल्हा संघटक तसेच पत्रकार लक्ष्मीकांत मुळे तालुका संघटक अर्धापूर यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला जिल्हा संघटक रामदास जी बोंडे यांनी करून अकोला जिल्ह्यात झालेल्या संघटन बांधणी विषयी सविस्तर माहिती दिली तर माजी जिल्हाध्यक्ष गजानन हरणे यांनी सुद्धा विचार व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन अकोट तालुका संघटक नंदकिशोर गोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळापुर तालुका संघटक संजय मेसरे यांनी केले.
यावेळी अकोला तालुका संघटक मनीष तिवारी, पातुर तालुका संघटक देवानंद गहिले, अकोला शहर संघटक महेश गुप्ता, बाळापुर तालुका संघटक संजय मेसरे, अकोट तालुका संघटक नंदकिशोर गोरडे, अंबादास वसु, संजय देडकर, विनोद गवर, सिद्धार्थ मेढे, अनिल शिंदे, किसनराव वरईकर, अक्षय गाडेकर, मनोज बनचरे, अविनाश देशमुख, नितीन देशमुख पत्रकार संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश सुरजुशे, बबनराव कांबळे, आदी उपस्थित होते.