अकोला- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनाकरीता ऑक्टोंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीकरीता 11 कोटी 38 लक्ष 49 हजार 300 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त अनुदान तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले असून विविध योजनांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात येत आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे तहसिलदार यांनी कळविले आहे.
वाटप करण्यात आलेले अनुदान याप्रमाणे : संजय गांधी राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण करीता 1 कोटी 51 लक्ष 50 हजार रुपये, संजय गांधी राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचीत जातीकरीता 1 कोटी 74 लक्ष 81 हजार 100 रुपये, संजय गांधी राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचीत जमातीकरीता 19 लक्ष 86 हजार 900 रुपये, श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारणकरीता 6 कोटी 32 लक्ष 70 हजार रुपये, श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचित जमातीकरीता 28 लक्ष 97 हजार रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना 74 लक्ष 6 हजार 800 रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृतीवेतन योजना 2 लक्ष 96 हजार 400 रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजनाकरीता 1 लक्ष 61 हजार 100 रुपये व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाकरीता 52 लक्ष रुपये, असे एकूण 11 कोटी 38 लक्ष 49 हजार 300 रुपये अनुदान संबंधित तहसिलदार यांच्याकडे वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी योजनाचे तहसिलदार मिरा पोगोरे यांनी दिली.