तेल्हारा प्रतिनिधी…
तेल्हारा तालुक्यातील ईसापुर ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे अंतर्गत संविधान सप्ताह साजरा करण्यात आला होता.बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,उमेश सोनवणे उपायुक्त तथा विभाग प्रमुख ( योजना ) बार्टी,पुणे,जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा नोडल अधिकारी अकोला विजय बेदरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तेल्हारा समतादूत शुभांगी लव्हाळे यांच्या मुख्य आयोजनात कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तद्नंतर उपस्थितांना संविधान उद्देशिका प्रत वाटप करण्यात आल्या तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी उपस्थितांना तेल्हारा तालुका समतादूत शुभांगी लव्हाळे यांनी संविधान आधारित विषयांवर मार्गदर्शन केले तसेच बार्टी उपक्रम व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली प्रसंगी कार्यक्रमाला ईसापुर ग्रामपंचायत सरपंच सौ.मिराताई आनंद बोदडे,उपसरपंच महादेवराव नागे, पत्रकार आनंद बोदडे, विनोद सगणे, कु.वर्षा फाळके, कृषी सहाय्यक बोचरे, ग्रामपंचायत सदस्य कमलबाई घोडस्कार, सौ. जयश्रीई घाटोळ, माजी उपसरपंच वासुदेवराव मोरे ज्ञानदेवराव बोदडे,श्रीराम वासतकार, दिनेश घाटोळ लखुजी घाटोळ महादेवराव शिंदे.महादेवराव बोदडे, दामोदर बोर्डे,वसंतराव नागे, पुंडलीकराव वारुळकर,सुरेश पोहनकार, मुकेश घोडस्कार, गजानन घाटोळ, राजेश बोदडे, शे.बिलनभाई शिक्षक प्रफुल वसे, मिराताई टिकार बचत गटाच्या महीला,कर्मचारी विध्यार्थी गण तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.