अकोला, दि.11: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालये येथे आज(दि. 11) राष्ट्रीय लोक अदालतीचे प्रारंभ झाले. जिल्हा न्यायलय येथे सिव्हील व क्रिमिनलचे 10 हजार 643 प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीस यनशिवराज खोब्रागडे यांनी दिली.
जिल्हा न्यायालय येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी एस.एस. स्वरुपकुमार बोस व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात 11 पॅनलची व्यवस्था करण्यात आली आहे. या पॅनलच्या माध्यमातून सिव्हील व क्रिमिनल प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे. यात निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्ट च्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे , कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे (तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळून),कोविड कालावधीत झालेले प्रकरणे व इतर (फौजदारी तडजोडपात्र, वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे) व कोर्टात प्रलंबित प्रकरणे तसेच लोक अदालतीच्या मार्फत विधी विषयक सल्ला व मार्गदर्शन मोफत देण्यात येणार आहे.