• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

देशाच्या लष्करी सामर्थ्याला धक्का; देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

Our Media by Our Media
December 8, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
118 1
0
Bipin Rawat
34
SHARES
852
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याला धक्का देणारी आज घटना घडली आहे. देशाचे पहिले आणि सध्याचे तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथे हा अपघात झाला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत अपघातग्रस्त हवाई दलाच्या या Mi17-V5 हेलिकॉप्टरमध्ये होते.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एकूण नऊ जण होते.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा, हवालदार सतपाल हे हेलिकॉप्टरमध्ये होते.
सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला परतत होते. त्यानंतर हवाई दलाचे Mi17-V5 हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले.

कॅमल वेलिंग्टन, ऊटी येथे त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे सीडीएस जनरल बिपीन रावत व्याख्यान देऊन परतत असताना अपघात झाला. कॅमल वेलिंग्टनमध्ये सशस्त्र दलाचे महाविद्यालय आहे. सीडीएस यांना घेऊन जाणारे विमान किंवा हेलिकॉप्टर उडवण्यासाठी एक विशेष प्रोटोकॉल आहे.

बिपिन रावत यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद स्वीकारले. याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. बिपिन रावत यांना लष्करातील अत्युच्च कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा

पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक तसेच विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

जनरल बिपीन रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील चौहान राजपूत कुटुंबात १९६३ साली झाला. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंह रावत होते, जे सैन्यातून या पदावरून निवृत्त झाले. रावत यांनी 1978 मध्ये 11 व्या गोरखा रायफलच्या पाचव्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

रावत यांनी डेहराडूनमधील कॅंब्रियन हॉल स्कूल, शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे शिक्षण घेतले, जिथे त्यांनी ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ प्राप्त केली. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि फोर्ट लीव्हनवर्थ, यूएसए येथील हायर कमांड कोर्सचे पदवीधर आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीज, डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर स्टडीज देखील केले आहे.

  • बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली.
  • आयएमए डेहराडून येथे त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आला.
  • देवी अहिल्या विद्यापीठातून संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एम फिल पदवी.
  • 2011 मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठातून मिलिटरी मीडिया स्टडीजमध्ये पीएचडी.
  • तसेच मद्रास विद्यापीठातून स्ट्रॅटेजिक आणि डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल.
  • राजपूत कुटुंबात जन्मलेल्या रावत यांच्या अनेक पिढ्या लष्करात.
  • जानेवारी 1979 मध्ये मिझोराममध्ये सैन्यात त्यांना पहिली नियुक्ती मिळाली.
  • नेफा परिसरात तैनात असताना त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले.
  • त्यांनी काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेचे नेतृत्वही केले.
  • त्यांनी 01 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
  • 31 डिसेंबर 2016 रोजी लष्करप्रमुख पद
  • बिपिन रावत यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद स्वीकारले.

 

 

Tags: Bipin Rawat
Previous Post

सीडीएस जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर; हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

Next Post

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक; मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण सत्र

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
विधान परिषद

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक; मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण सत्र

Madhulika Rawat

Madhulika Rawat : मधुलिका यांनी बिपीन रावत यांना दिली अखेरपर्यंत साथ; जाणून घ्या...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.