• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

City Reporter by City Reporter
December 7, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
127 1
0
सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती
21
SHARES
914
VIEWS
FBWhatsappTelegram

गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार कायम राहिलेला आहे. आठ दिवसांपूर्वीच  सोयाबीनच्या दरात तब्बल 600 रुपयांची घसरण ही झाली होती तर त्यानंतरही सोयाबीनचे दर हे सावरले होते. दरामध्ये कमी-जास्तपणा झाला असला तरी मात्र, शेतरकऱ्यांनीही सोयाबीन विक्रीची गडबड ही केलेलीच नाही. (Latur Market) मध्यंतरी 6 हजार 800 रुपये दर असतानाही 9 हजार पोत्यांचीच आवक होती तर मंगळवारी सोयाबीनला 6 हजार 400 दर असतनाही 10 हजार पोत्यांचीच आवक आहे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी वाढीव दराची शेतकऱ्यांचा प्रतिक्षा कायम आहे. 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तरच विक्री अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. तर तुरीची आवक सुरु होताच दर कमी होतील म्हणून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी वाढत आहे.

दर पुन्हा 6 हजार 400 रुपयांवर स्थिरावले
यंदा सोयाबीनचा हंगाम हा लांबत आहे. दरवर्षी दिवाळी नंतर आवक वाढते आणि डिसेंबर अखेरपर्यंत आवक कायम राहिल्याने सोयाबीनचा हंगाम संपुष्टात येत असतो. यंदा मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिक भर दिला होता. सध्याही दरात कमी-अधिकपणा झाला तरी साठवणूक याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. सध्याचा दर हा सरासरी असला तरी अनेकांना 7 हजारापेक्षा अधिकची अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवासाला 50 ते 60 हजार पोत्यांची आवक असते त्या बाजारसमितीमध्ये 10 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवकच झालेली नाही.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तुरीचा हंगाम तोंडावर
खरीप हंगामातील अंतिम पिक म्हणून ओळखले जाणारी तुरही आता बाजारात दाखल होईल. पावसामुळे तुरीची कापणी रखडलेली आहे. मात्र, यंदा तेलबिया आणि कापसाच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे या पिकांची हमीभावानेच खरेदी व्हावी असे काही नव्हते पण आता कडधान्यही बाजारात दाखल होणार आहे. यामध्ये तूर, हरभरा या पिकांचा समावेश राहणार आहे. यापूर्वीच सरकारने मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभऱ्याची आयात केली असल्याने दर कमीचा राहणार आहेत. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. तुरीचा आवक सुरु होताच पुन्हा दर कमी होण्याची शक्यता आहे.

Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ डिसेंबर पूर्वी सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

कृषी विभागाचे सर्वकाही ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही काय झाला मोठा बदल?

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
krishi-seva-kendra-pesticides-shop

कृषी विभागाचे सर्वकाही ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही काय झाला मोठा बदल?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत: महोत्सव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मुख कर्करोग आरोग्य शिबीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.