अकोला,दि.७: विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक खुल्या, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मतदान व मतमोजणी कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
मद्यविक्री बंद कालावधी खालीलप्रमाणे-
मतदान कालावधीत बुधवार दि.८ सायंकाळी चार ते शुक्रवार दि.१० सायंकाळी चार वाजेपर्यंत. तर मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दि.१४ रोजी मतमोजणी संपेपर्यंत. या कालावधीत संपूर्ण अकोला जिल्ह्यात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताची अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.