अकोला,दि.६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविले जाणारे गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अकोला हे आज दि.६ पासून कार्यान्वित झाले असल्याचे गृहपाल एस.एस. लव्हाळे यांनी कळविले आहे. ज्या विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात निवड झाली आहे, त्यांनी त्वरीत संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या वसतिगृहात इयत्ता ११ वी व १२वी साठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध होत्या. त्याअनुषंगाने अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर अशी होती. त्यानुसार प्राप्त अर्जातून गुणवत्ता व आरक्षण निहाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून वसतिगृहाच्या दर्शनी भागावर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सोमवार दि.६ पासून वसतिगृह प्रत्यक्ष सुरु झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी त्वरीत गृहपाल एस. एस. लव्हाळे, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदीराजवळ, हनुमान बस्ती, अकोला यांचेशी संपर्क साधुन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन गृहपाल एस एस लव्हाळे यांनी केले आहे.