अकोला,दि.६: मौजा उमरी येथील शेत सर्व्हे क्रमांक ६०,६१,व ६२ क्षेत्र ४८ एकर १८ गुंठे या जमिनीचे सर्वे सेटलमेंट नुसार पाडण्यात आलेले शिट क्र. ७४-ए,७४-बी, ६२-सी व ६२ डी मधील भूखंडधारकांना त्यांच्या भूखंडांच्या मालकीचे पुरावे बुधवार दि.१५ रोजी सादर करण्याबाबत जाहीर सुचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर सुचनेत म्हटल्यानुसार, मौजा उमरी येथील शेत सर्व्हे क्रमांक ६०,६१,व ६२ क्षेत्र ४८ एकर १८ गुंठे या जमिनीचे सर्व्हे सेटलमेंट नुसार पाडण्यात आलेले शिट क्र. ७४-ए,७४-बी, ६२-सी व ६२ डी मधील भूखंडधारकांना सूचित करण्यात आले आहे की, मा. लोकआयुक्त, महाराष्ट राज्य, मंबई यांना उपरोक्त जमिन शासकीय आहे किंवा खाजगी आहे याबाबत अहवाल सादर करावयाचा आहे. त्यादृष्टीने संबंधित शिट मधे ज्यांच्या मालकीचे भूखंड आहेत त्यांनी त्यांच्या भूखंडाच्या मालकी बाबत सेटलमेंट पासूनच्या पुराव्यासह जिल्हाधिकारी, अकोला यांचे दालनात बुधवार दि.१५ रोजी दुपारी १२ वाजता दाखल करावे. त्यानंतर यासंदर्भात संबंधितांची बाजू ऐकून घेतली जाणार नाही. असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले जाहीर सुचनेद्वारे सूचित केलेआहे.