• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पशु विज्ञान विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Our Media by Our Media
December 4, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
Veternary Univ Day
32
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.४ : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर च्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन (दि.३ रोजी) करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांचे शुभहस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण तसेच संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीतील यशासाठी कु. मनस्वी सुधीर देशमुख तर इयत्ता बारावीतील यशासाठी चि. श्रेयस सुनील हजारे, चि. शार्दूल रत्नाकर राऊळकर, कु. आदिती श्याम देशमुख, कु. आयुषी किशोर पजई आदींना रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दिघे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत, संस्थेतील कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक शेतकरी व पशुपालकाभिमुख काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले तर डॉ. प्रवीण बनकर यांनी सूत्रसंचालन व डॉ. आनंद रत्नपारखी यांनी आभारप्रदर्शन केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महाविद्यालयाने दत्तक ग्राम म्हणून निवडलेल्या मोरगाव भाकरे जि. अकोला येथे याप्रसंगी पशुमधील वंध्यत्व निवारण शिबीर व स्वच्छ दुध निर्मिती विषयक व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. दिघे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. थोरात, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. किशोर पजई, डॉ. महेश इंगवले, डॉ. श्याम देशमुख, डॉ. रत्नाकर राऊळकर आणि स्नातकोत्तर विद्यार्थी यांनी शिबिरात सुमारे ८० पशूंची आरोग्य तपासणी केली तर डॉ. गिरीश पंचभाई यांनी स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना दुधाचे महत्व आणि ग्रामस्थांना स्वच्छ दुधनिर्मिती विषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्थानिक प्रगतिशील पशुपालक दिनेश भाकरे यांच्या शेतजमिनीवर जुलै २०२१ मध्ये लागवड केलेल्या DHN 10 या बहुवार्षिक चारा पिकाची महाविद्यालय चमूने पाहणी व पुढील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात समन्वयक डॉ. मंगेश वडे, मोरगाव भाकरे ग्रामचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Tags: AkolaAnimalanimal dayUniversity of Animal
Previous Post

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१: कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र

Next Post

जिल्ह्यात जमावबंदी आदेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

जिल्ह्यात जमावबंदी आदेश

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवड अधिक पारदर्शक; ऑनलाईन अर्ज व मोबाईल ॲप्लिकेशन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.