वाडेगाव(डॉ चांद शेख)- बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडेगाव मध्ये ग्रामपंचायत कडून कचरा संकलनासाठी कचरा पेटी आणून गाव कचरा मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
गावात सार्वजनिक ठिकानवर प्लास्टिक पिशवी घरातील घाण रस्त्यावर टाकू नये यामुळे ग्रामस्थ चे आरोग्य केव्हाही धोक्यात येते. ग्राम्सथाचे आरोग्य चांगले राहावे व गाव स्वच्छ राहावे याकरिता ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी पुढाकार घेऊन १५ व्या वित्त आयोगातून गावात कचरा संकलन करण्यासाठी प्रत्येक वार्डात कचरा पेटी खरेदी करून ठराविक ठिकाणी कचरा पेट्या लावण्यात आल्या आहेत. गावातील वेगवेगळ्या भागात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी सुद्धा बसविण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी कचरा पेटी बसविने सुरू आहे.
सदर प्रक्रिया हे शासनाच्या नियमानुसार कायद्याच्या अधीन राहून प्रादर्शक पणे सुरू आहे. याबाबत ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. ते आरोप सर्व निरर्थक असून खोटे व जनतेची दिशाभूल करणारे आहेत. कचरा कुंडी खरेदी प्रक्रियात सर्व दस्तावेज आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामार्फत जिल्हा परिषडकडे सादर केलेले आहेत. ग्रामपंचायत वर केलेले आरोप हे सर्व बिनबुडाचे असून सर्व कामे शासनाच्या नियमानुसार केले जात असल्याबाबत ग्रामविकास अधिकारी गजानन डिवरे व सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले आहे.