अकोला,दि.2: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त जनऔषध वैद्यकशास्त्र, स्त्रीरोग प्रसुती शास्त्र व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती कस्तुरबा गांधी महिला रुग्णालय येथे गरोदर माता तपासणी, गर्भाशयाचा कर्करोग निदान तसेच संतुलित आहार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन आज करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात 72 गरोदर माता तपासणी व आहार समुपदेशन तसेच 59 रुग्णांचे गर्भाशय कर्करोग निदानासाठी प्रयोगशाळेत पाठविण्याकरीता नमुने घेण्यात आले. या शिबिराकरीता जनऔषध विभागाचे प्राध्यापक डॉ. संजीव चौधरी, स्त्री रोग शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अपर्णा वाहने, कस्तुरबा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, निर्मला वानखडे, जे.पी. सिरसाठ, प्रदिप चव्हाण, सुमित्रा मेत्राम आदि कर्मचारी उपस्थित होते.