• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणुक; प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित

Our Media by Our Media
December 1, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
169 2
0
nima arora
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.1 :  निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे कामे शुकवार दि. 3 डिसेंबरपासून सुरु होईल तर 28 जानेवारी 2022 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत घोषीत केलेला कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करुन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम

  1. शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी तहसिलदार यांनी गुगलअर्थचे नकाशे अध्यारोपीत (super impose) करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे.
  2. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे.
  3. सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणे. तसेच समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल.
  4. गुरुवार दि. 16 डिसेंबर रोजी समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्येतेसाठी सादर करणे.
  5. मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी नमुना ‘ब’ ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करणे व मान्यता देणे.शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला(अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील माहिलांसह) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी.
  6. सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.(आरक्षणाची सोडत काढणे)
    शुक्रवार दि.31 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे.

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे

1. सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहिर सूचना प्रसिद्ध करणे.

2. सोमवार दि. 10 जानेवारी रोजी प्रारुप प्रभाग व रचनेवर हरकती सादर करणे.

3. बुधवार दि.12 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे.

4. बुधवार दि. 19 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे.

5. सोमवार दि. 24 जानेवारी रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे.

उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रभाग रचना व आरक्षणाला शुक्रवार दि. 28 जानेवारी 2022 रोजी अंतिम मान्यता देणे. तसेच मान्यता प्राप्त अंतिम प्रभाग रचनेला बुधवार दि. 2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध देण्यात होईल.

Tags: AkolaElectionG.PNima Arora
Previous Post

पालघरमधील समुद्रकिनार्‍यावर जेलीफिशचे थैमान

Next Post

RTPCR : परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
RTPCR Test

RTPCR : परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची

ठाकुरदासजी तापडीया

तेल्हारा शहरातील बेलखेड रोडवरील निर्माण झालेल्या सभागृहाला स्व. ठाकुरदासजी तापडीया यांचे नांव देण्याची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.