• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण

City Reporter by City Reporter
November 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
91 1
0
जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण
14
SHARES
657
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे): पातुर शहरातील सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मिळणा-या मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी शासन दरबारी विविध मागण्या पुर्ण व्हाव्या म्हणून लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा पर्याय निवडला आहे.
संविधान दिनाच्या दिवशी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन करून या उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

जनसामान्य नागरिकांच्या असलेल्या लोक कल्याणकारी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

  • पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत मधील देशासाठी प्राणार्पण करणा-या शहिद कैलास निमकंडे यांच्या परिवाराला मंजूर करण्यात आलेल्या ५ एकर भुखंडाचा ७/१२ त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे तात्काळ करण्यात यावा,
  • पातुर नगरपरिषद मार्फत महाराष्ट्र शासनाने राबविलेली सुजल निर्मल जल योजना तात्काळ पुर्ण करण्यात यावी. ८/९ वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना मुदतीत पुर्ण न करण्यास जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच संबंधित ठेकेदारावर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून त्याचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे.
  • नैसर्गिक आपत्तीतून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तसेच मागील वर्षीचा न देण्यात आलेल्या पिक विमाची रक्कम तात्काळ देण्यात यावी.
  • पातुर शहर व तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाचे निधी वाटप तात्काळ करण्यात यावे.तसेच ड गटातील बाद झालेल्या विकलांग नागरिकांचे घरकुलाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
  • पातुर नगरपरिषद मध्ये स्थायी स्वरूपात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्काळ करण्यात यावी.
  • नगरपरिषद हद्दीतील नदीवरील पुलांची दुरावस्था झाली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्यात याव्या.
  • शहरातील सुवर्णा नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात यावे.
  • पातुर नगरपरिषद व ग्रामपंचायत मार्फत पातुर ते बाळापूर मार्गावर केलेल्या डागडुजी बद्दल ताळेबंद तपशील सादर करावा.
  • शहरातील आवश्यक असलेल्या गरजु नागरिकांना नवीन नळ जोडणी तात्काळ देण्यात यावी.
  • पातुर शहरासाठी आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयाची उभारणी तात्काळ करण्यात यावी.
  • पातुर शहरातील शेतकरी दिनकर देशमुख यांची नगरपरिषद पातुर ने बळकावलेली जमीन परत त्यांना देण्यात यावी.
  • पातुर नगरपरिषदने हिंदू स्मशानभुमीच्या आवंटीत केलेल्या जमीनीवर अग्निशामक दलाकरिता उभारलेल्या बिल्डींगच्या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती नेमण्यात यावी.
  • तालुक्यातील रब्बी हंगाम पिकांसाठी विद्युत पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवावा.
  • ज्या शेतकऱ्यांनी बॅंकचे कर्ज काढले आहेत व ते त्यांचे हप्ते नियमित भरतात अशा शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ देण्यात यावा.
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व तहसील कार्यालयात काम करणा-या कोतवाल पदाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी.
  • एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या शासकीय सेवेत सामावून घेणे.
  • पातुर तालुक्यातील माजी सैनिकांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे.
  • तहसील कार्यालयात मिळणारे शासकीय दस्तावेज यांच्या शुल्काचे दरपत्रक कार्यालयात दर्शनी भागात लावणे.

इत्यादी स्वरूपाच्या मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात याव्या अशा स्वरूपाची मागण्या आहेत.

Previous Post

ब्रेकिंग- पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पथकाने पातुर तालुक्यात पकडला ३किलो गांजा.. २आरोपीस अटक

Next Post

गायगाव ता.बाळापूर येथे सर्वाधिक लसीकरण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
गायगाव ता.बाळापूर येथे सर्वाधिक लसीकरण

गायगाव ता.बाळापूर येथे सर्वाधिक लसीकरण

School Reopen : शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरु होणार ! आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

School Reopen : शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरु होणार ! आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.