पातूर (आगेखेड):(सुनिल गाडगे): आज दि: २७/११/२०२१ रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की, पातुर आगिखेड़ शेतशिवारात शेख शहजाद शेख शब्बीर रा पातुर, देवगन संभुजी अवचार रा आगिखेड़ यांच्या शेतामध्ये ते गांजाची झाड़े लागवड करून गांजा विक्री करीत आहेत अशा ख़बरेवरुन पंचासमक्ष छापा मारला असता वरील दोन्हीहि आरोपी यांच्या शेतात गांजाची ६ मोठी झाड़े व घरामध्ये ३ किलो गांजा, किंमत ३०,००० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थलावरुणं जप्त केला व वरील दोन्हीहि आरोपी विरुद्ध पो स्टे पातुर येथे NDPS ACT कलम 20B प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे,सदर कार्यवाही मा पोलिस आधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या विशेष पथकाने केली,