तेल्हारा प्रतीनीधी शुभम सोनटक्के
तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिक बांधवांसाठी मोफत लसीकरण प्रमाण पत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन दि.24 नोव्हेंबर 2021 ला करण्यात आले होते .
स्थानिक प्रभाग क्रमांक 2 मधील समाज सेवक गजानन मोरखडे, प्रा.सचिन थाटे, निलेश विजय धनभर यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोव्हीड लसीकरण करण्यासाठी जागृती करून नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी व सर्व शासकीय बाबीसाठी लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे असल्याने त्या अनुषंगाने नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे .
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..या कार्यक्रमाला तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडिया प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 318 नागरिकांना लसीकरण प्रमाण पत्र मोफत वाटप,विजय धनभर,रामदास माहोकार ,नंदकिशोर मलीये, लक्ष्मण थाटे, मदन सत्रावले, राजेश कारंडे, गजानन पवार,सुनील मोरखडे,रामेवेश्वर आप्पा कौटकर, राजेश आप्पा गंभीरे,गजानन रत्नपारखी,राजेश पवार , शिवपाल सिंग मलीये, रामदास नंदाने, बंडू सैनी, दिनेश रत्नपारखी,सचिन अवचार, कैलास पवार, सुरेश सिसोदिया, अरुण सिसोदिया, रतन बायड, गोविदा फुलवंदे ,धिरज जयस्वाल संदीप नेमाडे ,छोटू विखे,
यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला गजानन मोरखडे, सचिन थाटे , निलेश विजयराव धनभर , किशोर डांबरे यांनी विशेष सहकार्य केले.त्याच बरोबर नागरिकांच्या नोंदणी करिता शाम राहटोले , योगेश रत्नपारखी , कैलास पवार, विजय गायकवाड, अनिरुद्ध थाटे यांनी परिश्रम घेतले .