• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम: राज्यघटनेच्या अंमलबजावणीतून होईल लोकशाही समृद्ध- डॉ.पांढरपट्टे; संविधान दिनाचे औचित्यःउद्देशिका वाचन व ७५ हजार प्रतिंचे वितरण

Our Media by Our Media
November 26, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम: राज्यघटनेच्या अंमलबजावणीतून होईल लोकशाही समृद्ध- डॉ.पांढरपट्टे; संविधान दिनाचे औचित्यःउद्देशिका वाचन व ७५ हजार प्रतिंचे वितरण
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- संविधानाच्या उद्देशिकेचा प्रत्येक शब्द हा अभ्यासावा असा आहे. आपली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना असून या राज्यघटनेची अंमलबजावणी करुन लोकशाही अधिकाधिक समृद्ध होईल,असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक व अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक प्राधिकारी विधान परिषद मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.
संविधान दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनामार्फत संविधान उद्देशिकेचे वाचन व ७५ हजार संविधान उद्देशिकांच्या प्रति वितरणाचा कार्यक्रम नियोजन भवनात पार पडला. या सोहळ्यास डॉ. पांढरपट्टे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, सहयोगी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, सहायक आयुक्त समाजकल्याण श्रीमती राठोड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, बार्टीचे विजय बेदरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रारंभी मुंबई येथील (२६/११/२००८ च्या) दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील व देशाच्या सिमेवर रक्षण करतांना बलिदान दिलेल्या शहिदांना स्तब्ध उभे राहून व मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

आपल्या भाषणात डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, जगात असे अनेक देश आहेत की ज्यांची स्वतःची घटना नाही. आपली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे. या राज्यघटनेच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाला व्यापक अर्थ आहे. इतिहास आहे. आपण नागरिक म्हणून या प्रत्येक शब्दावर विचार करुन अंमल करु तेव्हा आपले अनेक प्रश्न सुटलेले असतील. तेव्हा आपण या देशाचे नागरिक म्हणून संविधाना प्रमाणे वागावे, त्यावर अंमल करावा आणि आपली लोकशाही समृद्ध करावी,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी उद्देशिकेचे महत्त्व सांगितले, त्या म्हणाल्या की, उद्देशिकेतील आचार, कर्तव्य व सेवा हे शब्द प्रशासनातील प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यावर अंमलबजावणी करुन लोकांना सेवा देणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नागरिकांनीही आपापल्या क्षेत्रात यावर अंमलबजावणी करुन काम करावे,असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर आरोग्य, पोलीस, स्काऊट गाईड, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक अशा सर्व गटांतून पाच पाच व्यक्तिंना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात संविधान उद्देशिकेचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. तर सदाशिव शेलार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर बळी यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व सेवा, सामाजिक व विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: ConstitutionDemocracydistrictDr. Pandharpatteindependenceoccasion
Previous Post

ब्रेकिंग – अकोला जिल्ह्यात संवेदनशील वातावरणात ठाणेदार फड यांची दबंग फडगिरी एकास देशी कट्ट्यासह अटक

Next Post

तेल्हारा प्रभाग क्रमांक 2 येथे मोफत लसीकरण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा प्रभाग क्रमांक 2 येथे मोफत लसीकरण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

तेल्हारा प्रभाग क्रमांक 2 येथे मोफत लसीकरण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१:अर्ज माघारीनंतर दोघे उमेदवार रिंगणात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.