अकोला,दि.24: निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
त्यानुसार नामनिर्देशन पत्र मागविण्याचा कालावधी हा मंगळवार दि.३० नोव्हेंबर ते सोमवार दि.६ डिसेंबर असा आहे. तथापि, या कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी नामनिर्देशन स्विकारण्यात येऊ नये असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमी देण्याचा कालावधी संपुष्टात आल्याने आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही आयोगाचे निर्देश आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं., जि.प., पं.स. निवडणूक विभाग संजय खडसे यांनी दिली आहे










