अकोला : राज्य निवडणुक आयोगाचे पत्र दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये निधन,राजिनामा, अर्नहता किंवा इतर अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्य निवडणुक आयोग यांनी त्याचेकडील दि.17 नोव्हेंबर व दि. 18 नोव्हेंबर चे आदेशान्वये व मा. सर्वोच्च न्यायालय यांचेकडील दि. 04 मार्च 2021 चे आदेशान्वये तसेच सन 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.3 दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजीच्या अध्यादेशान्वये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकुण आरक्षण 50 टक्केच्या मर्यादेत ठेवावे आणि नागरिकांच मागासवर्ग प्रवर्गाचे एकुण आरक्षण 27 टक्कयापर्यंत ठेवावे. तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पुर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये सुधारणा करण्यात यावी असे आदेशित केलेले आहे.
मा.राज्य निवडणुक आयोग यांनी त्याचेकडील दि.17 नोव्हेंबर व 18 नोव्हेंबर 2021 चे आदेशान्वये सर्व तहसिलदार यांनी ज्या ग्रामपंचायतील मधील आरक्षण 50 टक्के पेक्षा जास्त झाले. तसेच नागरिकांच मागासवर्ग प्रवर्गाचे एकुण आरक्षण 27 टक्के पेक्षा जास्त झाले. त्या ग्रामपंचायतीमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षीत करण्या करिता प्रस्तावित केले आहे. मा. राज्य निवडणुक आयोग यांनी त्याचेकडील दि. 17 नोव्हेंबर व 18 नोव्हेंबर 2021 चे आदेशान्वये खालील प्रमाणे अकोला जिल्हयातील तालूका निहाय नागरिकांच्या मागास प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरता दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी सूधारित आदेशाव्दारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
अ.क्र. तालूक्याचे नाव एकूण ग्रा.पं.ची संख्या रिक्त पदाची संख्या रिक्त नागरिकांचा मागास प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरिता निश्चित केलेल्या ग्रा.प. संख्या व सदस्य संख्या अ.जा अ.ज. नामाप्र सर्वसाधारण ग्रा.प.संख्या सदस्य संख्या.
1 तेल्हारा 10 1 7 2 4 2 2
2 अकोट 33 27 23 30 2 19 20
3 मुर्तिजापूर 50 58 09 50 3 34 42
4 अकोला 38 25 15 28 2 22 27
5 बाळापूर 19 12 04 12 1 9 9
6 बार्शिटाकळी 28 23 13 17 3 12 13
7 पातूर 22 09 11 11 1 9 10
एकूण 200 155 82 150 16 107 123