तेल्हारा( विकास दामोदर)-: आज दि.22 नोव्हेंबर रोजी तेल्हारा पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सौ. उज्ज्वला हेमराज काळपांडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सौ. उज्ज्वला काळपांडे यांनी तर अवघ्या महराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा शिवसेना व भाजप परस्पर विरोधी असून देखील या पंचायत समितीत युती करण्यात आली व या युतीकडून शिवसेनेच्या सौ. जयश्री अतुल घंगाळ सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला परंतु ऍड, संतोष राहाटे, गोपाल कोल्हे, अशोक दाऱोकार, किशोर मुंदळा, दिपक बोडखे यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनात व्युवरचना आखून विजयश्री अलगद खेचून आणला. विशेष म्हणजे सेनेच्या सौ. घंगाळ यांची वेळेच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न होचु शकल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज खारीज करत सौ. काळपांडे यांची सभापती पदासाठी विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली. विरोधकांनी जो अपप्रचार चालवला होता तो त्याला वंचितच्या शिलेदारांनी झणझणीत विजय रूपाने चोख उत्तर दिले.
सदर निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून ऍड. संतोष राहाटे, दिपक बोडखे यांनी काम पहिले तर निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार राजेश गुरव व सहाय्यक नंदू पचांग यांनी काम पहिले सचिव म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांनी काम पहिले यावेळी विजयोत्सवात सौ. प्रतिभाताई भोजने, बापूराव भोजने, अशोक दाऱोकार, अनंत अवचार, विकास पवार, प्रल्हाद पाचपोर, रोशन दाऱोकार, प्रा. विकास दामोदर, सिद्धार्थ गवारगुरू, आंनद बोदळे, सुरेंद्र भोजने, मो. सलीम, नितीन वानखडे, गुलाम आरिफ, राजपाल वारुळे, सुमेध गवारगुरू, ऍड. सद्गुरू निवाने, प्रदिप तेलगोटे तर महिला आघाडीच्या सौ. राहाटे, सौ. प्रमोदींनी कोल्हे, सौ. माधुरी हिवराळे, इ. कार्यकर्त्यांनी हिरारीने सहभाग घेतला.
शेवटी अकोला जिल्ह्यातील परिस्थिती पाहता जमाव न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील त्रिमूर्तीना अभिवादन केले व छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकोबा यांच्या पुतळ्यांना माळ्यार्पण करून गटनेता प्रा. संजय हिवराळे यांनी सर्वांचे आभार मानले.