तेल्हारा : ( शुभम सोनटक्के ) तेल्हारा तालुक्यात वाघाची दहशत दिवसान दिवस वाढत असल्यामुळे तसेच कृषीपंपाची लाईट रात्री येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना मध्य रात्री शेतात जावे लागते.
या दरम्यान अनूसूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा महत्वपूर्ण प्रश्न तहसीलदार तेल्हारा यांच्या कडे या वेळी उपस्तीती करण्यात आला. तेल्हारा तालुक्यातील कोठा रायखेड बेलखेड शिवारामध्ये काही दीवसा अगोदर वाघ आढळून आला होता. वाघाने बर्याच पाळीव जनावरांची शिकार केली आहे. सदर बाबतीत माहीती अकोट वनविभागाला कडवीण्यात आली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहनी करून या शीवारात वाघ असल्याचे सांगीतलेलं आहे. अजून पर्यन्त वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. दररोज हा वाघ शेतकर्यांना शेतमजूरांना दिसत असून सर्वीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता रब्बी हंगाम सुरू झाला असून पेरणी आटोपली आहे. तसेच कुषी पंपाची वेळ रात्री आणी दीवसा ठरवून देण्यात आली आहे. त्या मुळे पीकांना पाणी देण्याकरीता मध्य रात्री शेतात जावे लागते.
या दरम्यान अनूसूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कृषी पंपाची लाईट रात्री ऐवजी दिवसा देण्यात यावी अशी मागणी माळेगाव व बेलखेड फीडर वरील शेतकरी बांधवांनी मुख्य अभियंता महावीतरण तेल्हारा यांच्या कड़े निवेदना व्दारे केली आहे. सदर नीवेदनावर मंगेश ठाकरे, बबलु ठाकूर, दयालसिंह बलोदे, श्रीराम ठाकरे, श्रीकृष्ण ठाकरे, शाम घोंगे, प्रशांत ठाकरे, वसंता घंगाळ, अनील पांडे, कार्तिक पोहरकार, कीशोर कापसे, विजय ठाकरे, कारंडे, अमीत ठाकरे, अश्वीन ठाकुर, गणेश थारकर, राहुल झापर्डे, मंगेश मामनकार, मधुकर गाडगे, अनील ठाकरे, यांच्या सह्या आहेत.