अकोला, दि.16: सामाजिक न्याय विभागामार्फत बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागास प्रवर्गातील होतकरु विद्यार्थ्यांना गुणवत्ते व जातीनिहाय ऑफलाईन इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत प्रवेश देण्यात येणार आहे.
वसतीगृहात प्रवेशितांना मोफत भोजन, निवासव्यवस्था, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता व स्वच्छता भत्ता दिला जातो. प्रवेश प्रक्रिया विद्यालय व महाविद्यालय येथे प्रवेशाकरीता राबविल्या जात आहे, असे बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.