पातूर (सुनिल गाडगे): दिनांक १२/११/२०२१ रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा करीता निवड चाचणी अकोला येथे संत गाडगेबाबा व्यायाम शाळा शिवाजीनगर, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी पार पडले.
यामध्ये पातूर येथील श्री आनंदराव किसनराव कढोणे यांचा धाकटा मुलगा पै. पुष्पराज आनंदराव कढोणे याची ९७ किलो वजन गटात (माती विभागात) कुस्ती जिंकून निवडीवर शिक्कामोर्तब केले. आणि संपुर्ण अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र केसरी मैदान बालेवाडी, पुणे येथे अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व पै. पुष्पराज कढोणे करणार आहेत. करिता जिल्हाभर सर्वत्र कौतुक होत असून पुढील यशस्वी करिता सर्व स्तरातून शुभेच्छा प्राप्त होत आहेत. पै. पुष्कराज कढोणे आपल्या निवडीचे श्रेय आई वडील व भाऊ वस्ताद पै रुपेश भाऊ काळमेघ, पै संजू भाऊ यादव, पै संतोष राऊत, श्री मुकेश कुमार व पातुर शहरातील सर्व मल्लांना देत आहेत.