• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पत्रपरिषद: स्वतःसह, कुटुंब आणि समाजाच्या हितासाठी कोविड लसीकरण आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
November 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
88 1
0
nima arora
28
SHARES
638
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९: कोविड लसीकरणाचे अकोला जिल्ह्यातील प्रमाण हे राज्यात सर्वात कमी आहे. तिसऱ्या लाटेचे अनुमान ही वर्तविण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी व उपयुक्त मार्ग आहे, तेव्हा ज्यांनी अद्याप लसीकरण केले नसेल अशा व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या; आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सभोवताली असलेल्या समाजाच्या हितासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

जिल्ह्यात कोविड लसीकरण १०० टक्के करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले असून बुधवार दि.१० ते शनिवार दि.२० या दहा दिवसांच्या कालावधीत लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी सांगितले की, अकोला जिल्ह्यात कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ५४ टक्के आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २५.४१ टक्के आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुमानाच्या अनुषंगाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बुधवार दि.१० पासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात शासकीय कर्मचारी हे घरोघरी जाऊन लोकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करतील, त्यांच्या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे श्रीमती अरोरा यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार म्हणाले की, या विशेष लसीकरण मोहिमेसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच अन्य ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून प्रत्येकाकडे ६० ते ७० व्यक्तींची यादी देण्यात आली आहे. त्यांना ते संपर्क करुन लसीकरण करण्याचे आवाहन करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यासोबतच लोकांच्या सोईनुसार लसीकरण सत्र आयोजित करण्याबाबत जिल्हाप्रशासनाने नियोजन केले असून लोकांच्या कामाच्या वेळेनुसार सायंकाळी लसीकरण सत्र आयोजित करण्याचेही नियोजन प्रशास्सनाने केले आहे.

यावेळी बोलतांना माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा म्हणाले की, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोविड लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण न केलेल्या व्यक्तीला संसर्ग होण्याची तसेच अशा व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणास प्रतिसाद द्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी इम्रान खान, जावेद जकेरिया, शौकत अली मिरसाहेब, सैय्यद जव्वाद हुसेन, सिद्धार्थ शर्मा, रिजाय खान लोधी आदींनी लसीकरणाबद्दल आपले अनुभव सांगत लसीकरणासाठी लोकांना आवाहन केले व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Tags: Akolacovid vaccinationFamily and societyNima Arora
Previous Post

आजपासून (दि.१०) लसीकरणासाठी विशेष मोहीम -जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Next Post

एसटी स्थानकातून धावल्या खासगी गाड्या, संप चिघळण्याची शक्यता

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
st bus

एसटी स्थानकातून धावल्या खासगी गाड्या, संप चिघळण्याची शक्यता

St Buses

एसटीचा संप चिघळणार : ४५ आगारांमधील ३७६ एसटीचे कर्मचारी निलंबित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.