अकोला: दि. ३: प्रधानमंत्री पीक विमा योजना एचडीएफसी इर्गो विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना असलेल्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सकाळी साडेदहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रार, अडचण असल्यास अशा शेतकऱ्यांनी दर सोमवारी होणाऱ्या सभेमध्ये सहभागी व्हावे,असेआवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.