• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राजकारण

मुख्यमंत्री म्हणाले, “फटाके फोडा आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका”

Our Media by Our Media
November 2, 2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
96 1
0
उद्धव ठाकरे
15
SHARES
696
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत

बारामती: नवाब मलिक आणि भाजप, समीर वानखेडे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस नवे वळण घेताना दिसत आहे. आता या विषयावर मुख्यमंत्री म्हणाले, “पवार कुटुंब विकासात गुंतलं आहे. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणले जात आहेत. हे आपल्या संस्कृतीचं लक्षण नाही. विघ्नसंतोषी मंडळी खूप आहेत. त्यांना चांगल्या कामात अडथळे आणून काय मिळतं? चांगल्या कामाच्या आड मी येणार नाही”, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती मांडलं.

इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी भाजपबरोबरच्या २५ वर्षांच्या युतीवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “युतीमध्ये आम्ही २५ वर्षे अंडी उबवली. फटाके उडवा. आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका”, असाही खोचक सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

नवाब मलिका काय म्हणाले?

“मी कोणत्याही महिलेवर आरोप केला नाही. दोन्ही महिलांना उल्लेख यासाठी आला की, त्यांचा या प्रकरणात समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी अजित पाटील, संजय राऊत, एकनाथ खडसे, यांच्या घरातील महिलांवरदेखील आरोप केला. त्यांच्या घरातील महिला आणि इतरांच्या घरातील महिला नाहीत का? देवेंद्र फडणवीस तुमचा नियटवर्तीय समीर वानखेडे आहेत, त्यांच्याकरवी माझा तपास करा. माझ्या जावयाच्या घरातून कोणतंही ड्रग्ज जप्त करण्यात आला नाही. हवंतर त्याचा पंचनामादेखील देतो. मी कोणतेही हवेत आरोप करत नाही”, असं प्रत्युत्तर मलिकांनी फडणवीसांना दिलं आहे.

“माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे कुणीच सिद्ध करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना मला अटक का केली नाही? त्यामुळे बाॅम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट पाहू नका. पंचतारांकीत हाॅटेलमध्ये आयोजित पार्टी तुम्हाला दिलस्या नाहीत का? एका टेबलची किंमत १५ लाख रुपये होते. सॅम डिसुझा, फ्लेचर पटेल, मनीष भानुशाली, के. पी. गोसावी यांना घेऊन समीर वानखेडे मुंबईत येताच ‘प्रायव्हेट आर्मी’ उभी केली. या आर्मीन कोट्यवधींची वसुली केली. वानखेडे यांनी मालदिवमध्ये वसुली केली.”

“समीर वानखेडे हे ७० हजारांचा शर्ट वापरतात. लाखो रुपयांचं घड्याळ घालतात. १ लाखाची पॅन्ट वापरतात. २ लाखांचे बूट वापरतात, इतके प्रामाणिक अधिकारी आहेत. जेएनपीटी बंरदावर १५ दिवसांपासून ५१ टन पडून आहे, पण कारवाई नाही. अनिल देशमुखांदेखील फसविण्यात आलं आहे. राजकीय सुडापोटी त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई नेत्यांना घाबरविण्यासाठी केल्या जात आहेत. परबवीर सिंगांना कुठं आहेत. जाणीवपूर्वक त्यांना देशातून बाहेर पडण्यास मदत करण्यात आली. याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल”, अशीही माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांचे कनेक्शन असल्याचा आरोप करत मलिक यांनी कारागृहात असलेल्या जयदीप राणांचा फोटो ट्विट केला होता. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून त्याच्यासोबत एका फोटोत फडणवीस दिसत होते. माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आशिर्वादानं ड्रग्ज कारभार सुरु होता. याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत मलिकांवर हल्लाबोल केला.

माझा आणि माझ्या पत्नीचा त्या व्यक्तीशी संबंध नाही. मलिकांनी केलेले आरोप लवंगी फटका आहेत. दिवाळी झाल्यानंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात सापडला. या अनुषगांने मलिकांची पार्टी ड्रग्ज माफिया म्हणावी लागले, असा पलटवार त्यांनी केला. सुरुवात मलिकांनी केली, शेवट मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही, असे टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

Tags: Devendra FadanvisNavab malikPoliticsuddhav thakre
Previous Post

पातुर येथील पंकज पोहरे यांना आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Next Post

डाक जीवन विमा योजना; थेट अधिकर्ता पदाकरीता 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

RelatedPosts

आळंदा
Featured

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

April 3, 2023
विमानतळ स्वागत २
Featured

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत

March 27, 2023
Eknath Shinde
Featured

ब्रेकिंग : अखेर तिढा सुटला धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदें गटाला, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

February 17, 2023
दिशा समिती बैठक
Featured

दिशा समिती बैठक; मनरेगा मधून पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबवा-आ.रणधीर सावरकर

February 17, 2023
nima arora
Featured

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश

January 30, 2023
Election
Featured

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 430 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण

January 25, 2023
Next Post
India Post GDS Recruitment 2020 : दहावी पास उमेदवारांना पोस्टात ४ हजार २६९ जागांची भरती

डाक जीवन विमा योजना; थेट अधिकर्ता पदाकरीता 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना प्रस्तावित कामांचे वाटप जिल्‍हा काम वाटप समितीची मंगळवारी (दि.9) बैठक

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना प्रस्तावित कामांचे वाटप जिल्‍हा काम वाटप समितीची मंगळवारी (दि.9) बैठक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.