Dhanteras 2021 धनतेरस : वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा करतात. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यावर्षी मंगळवार, २ नोव्हेंबर २०२१ रोजी धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित करूया. धनतेरस, धनत्रयोदशीनिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश…
“लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा”
“धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
“धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा”
“धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
आपणास निरामय आरोग्यदायी जीवन लाभो,
आपणावर धनवर्षावर अखंडित होवा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा”
“आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”