अकोला: दि.2: रब्बी हंगामाची पेरणी सुरुवात झाली असून शेतकरी वर्गाकडून डीएपी खताच्या उपलब्धेबाबत मागणी होत आहे. त्यानुसार कृषि विभाग आयुक्तालयाने 10:10:26, 12:32:16, 20:20:0:13, 15:15:15 ही संयुक्त खते व एसएसपी या खताचा डीएपी खतास पर्यायी खत म्हणून वापरास शिफारस केलेली आहे.
संयुक्त खते अकोला जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी डीएपी खताऐवजी संयुक्त खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि विभागाचे कृषि विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे यांनी केले आहे.