अकोला: दि.1: बाळापुर तालुक्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत 489 खातेदांराचे आधारप्रमाणीकरण प्रलंबित आहे. या प्रलंबित खातेधारकांनी सोमवार दि. १५ ऑक्टोबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन सहकार संस्था बाळापूरचे सहायक निबंधक व्हि. एम. बोराडे यांनी केले आहे.
शासनव्दारे 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 सुरु केली आहे. या योजनेचा बाळापूर तालुक्यात 14481 पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्टक्रमांकासह प्राप्त झाल्या असून त्यापैकी 14006 खातेदांरानी आधारप्रमाणीकरण झाले आहे. तर आधारप्रमाणीकरण न झालेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे 270, कॅनरा बॅंकचे तीन, सेट्रल बॅंक ऑफ इंडीयाचे 133, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे 52, युको बॅंकचे 10, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकचे 19, एच.डी.एफ.सी. व आय.डी.बी.आय. बँकेचे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 489 खातेदारांचे आधारप्रमाणीकरण होणे शिल्लक आहे. प्रलंबित आधारप्रमाणीकरण करण्यासाठी सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 पर्यत मुदत देण्यात आली आहे. ज्या खातेदारांना विशीष्टक्रमांक प्राप्त असतांनाही अदयापपर्यत आधारप्रमाणीकरण केले नाही. अशा शेतकरी बांधवानी आधारप्रमाणीकरण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.