अकोला:दि.1 देशाचे पहिले माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.