• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ :सामर्थ्यशील भारताच्या निर्माणात योगदान द्यावे-राज्यपाल कोश्यारी

Our Media by Our Media
October 29, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
DIKSHANT SAMARAMBHA
14
SHARES
626
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.२९: नव्या व सामर्थ्यशील भारताचे निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर, संशोधकांनी योगदान द्यावे,अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारताला आता ह्या संशोधकांनी दर्जेदार व अधिक पोषणमूल्य असणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्मिती करावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती कृषि विदयापीठ मा. श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संकरीत पद्धतीने (प्रत्यक्ष तथा अभासी ) कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात अत्यंत शिस्तीत पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तथा कुलपती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मा. श्री. भगत सिंह कोश्यारी हे अभासी पद्धतीने उपस्थित होते, तर महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना.श्री.दादाजी भुसे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप महासंचालक मा. डॉ. आर.सी. अग्रवाल, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू मा. डॉ. आशिष पातुरकर, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण (अभासी पद्धतीने) यांचे सह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले, विदयापीठ कुलसचिव मा.डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. एम एल मदन (अभासी पद्धतीने), मा.डॉ.शरदराव निंबाळकर, मा. डॉ. व्यंकटराव मायंदे (अभासी पद्धतीने), विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य तथा सदस्य विधान परिषद मा. आ.गोपीकिशन बाजोरिया, मा.आ.अमोल मिटकरी तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्मानीय इतर सदस्य मा.श्री मोरेश्वर वानखेडे, मा.डॉ. अर्चना बारब्दे, माजी कार्यकारी परिषद सदस्य मा.श्री. गणेश कंडारकर, मा.श्री विनायक सरनाईक व मा.विद्यापीठ विद्या परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी उपस्थित मान्यवरांना सन्मानाने दीक्षांत मिरवणुकी द्वारे पदवीदान सोहळ्यास पाचारण करण्यात आले. मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिहं कोश्यारी यांच्या अनुमतीने पदवीदान सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रागीताने प्रारंभ झालेल्या या दीक्षांत समारंभात एकूण ३५५९ स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या, यामध्ये बी.एस्सी (कृषि) २४८९, उद्यान विद्या १८७, वन विद्या २८, कृषि जैव तंत्रज्ञान १११, कृषि व्यवसाय व्यवस्थापन ७०, बी. एस्सी. अन्नशास्त्र ८१, बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) ८९, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) २१८, उद्यान विद्या ३१, वनविद्या ०२, कृषि अभियांत्रिकी ०७, एम. बी. ए (कृषि) १९, पीएच.डी २७ आदीचा समावेश आहे. उपरोक्त १२५८ स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात २४ आचार्य पदविधारक स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारली व उर्वरित १२३४ स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी स्वीकारतील. तर ३१ सुवर्ण, १६ रौप्यपदके, ३३ रोख तर तीन जणांना पुस्तकी स्वरुपात असे एकूण ८३ जणांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. २७ जणांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉपीची पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठांमधील शिक्षण त्याचा संशोधन कार्यामध्ये आपले उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षक तथा संशोधकांना विविध पदके तथा पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत गायन झाले. त्यानंतर सरस्वती वंदना होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविकपर भाषण करुन विद्यापीठाचा कार्य अहवाल सादर केला. त्यानंतर प्रति कुलपती मा.ना. श्री. दादाजी भुसे तथा इतर मान्यवरांचे शुभ हस्ते विधीवत पदवीदान व पारितोषिक वितरण पार पडले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करतांना विद्यापीठाच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल कौतूक केले. विद्यार्थ्यांचे तसेच नव संशोधकांचेही त्यांनी कौतुक केले. आपले संशोधन हे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे व सुलभ असावे. तसेच संशोधनाच्या क्षेत्रात आपल्या विद्यापीठांचे बहुमोल योगदान असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या मार्गदर्शनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, १९६० च्या सुमारास आपला देश आयात अन्नधान्यावर अवलंबून होता. आज आपण अन्नधान्य उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण आहोत. याचे श्रेय कृषी संशोधक व शेतकऱ्यांना आहे. देशात हरित क्रांती झाली. नंतर श्वेत क्रांती झाली आता आपले पंतप्रधान नील क्रांती करण्याची धोरणे आखत आहेत. आपल्या देशात अन्नधान्य उत्पादन विपुल होत असले तरी ते पोषणमूल्याने परिपूर्ण असावे यासाठी अधिक संशोधन व्हावे. आपली कृषी उत्पादने अधिक दर्जेदार असावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, नवा व समर्थ भारत घडविण्यासाठी संशोधकांनी ,युवक युवतींनी पुढे यावे, सुंदर भारत व सुंदर विदर्भ हेच युवक घडवू शकतात, अशा शब्दात त्यांनी युवा शक्तीवर आपला विश्वास व्यक्त केला. पसायदान व तत्पश्चात राष्ट्रगीत होऊन कुलपतींच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योती हातेकर यांनी केले कार्यक्रमात इंद्रधनुष्य मेलोडी ग्रुपच्या कलावंतांनी विद्यापीठ गीत, सरस्वती वंदना व पसायदान सादर केले.

Tags: AgriculturalAkolaDr. Punjabrao DeshmukhUniversity
Previous Post

कृषी विभागाची आढावा बैठक ‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’, या ध्येय्याने वाटचाल-कृषीमंत्री दादाजी भुसे; योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा यंत्रणेला निर्देश

Next Post

हसन मुश्रीफ यांची मोर्चामध्येच घोषणा; दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना बोनस

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
हसन मुश्रीफ यांची मोर्चामध्येच घोषणा

हसन मुश्रीफ यांची मोर्चामध्येच घोषणा; दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना बोनस

aryan khan

aryan khan cruise drugs case : आर्यन खानची 'आर्थर रोड' मधून सुटका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.