• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मास्कचा वापर बंधनकारक-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Our Media by Our Media
October 29, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
206 2
0
nima arora
31
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.29: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेत निर्बंधासह शिथीलता देण्यात आली आहे. या शिथीलतेमुळे कोविड-19 संसर्गाचा फैलाव होवू नये याकरीता शासनाच्या दिशानिर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांना मास्कचा वापर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्यानुसार, अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधीत कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख, प्रभारी अधिकारी यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे, ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजा दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधीत विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा अधिकाऱ्यास नामनिर्देशित करतील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधीत अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी, कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेले अधिकारी दंड करण्यास समक्ष प्राधिकारी राहील.

अकोला जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी त्यांचे कार्यक्षेत्राकरीता त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना त्यांचे कार्यालयाच्या परिसरात विनामास्क आढळून येणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता प्राधिकृत करावे.

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कार्यालयामध्ये आढळून आलेल्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी हे विनामास्क आढळून आल्यास त्यांना 200 रूपये प्रत्येकी या प्रमाणे दंडाची आकारणी करावी. सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यांगत, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधीत कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दंडाची रक्कम महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल एक सर्वसाधारण सेवा 0070-इतर प्रशासनीक सेवा 800 इतर जमा रक्कम लेखशिर्षाखाली जमा करावी.

अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यालयाच्या आवारात मास्क लावणे अनिवार्य राहील अशा प्रकारच्या सूचना दर्शनी भागात लाऊन तसेच सूचित करावे व अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांनी मास्क लावल्याशिवाय त्यांना प्रवेश देण्यता येऊ नये. नो मास्क नो एन्ट्री चे फलक दर्शनी भागावर लावण्यात यावे.

आदेशाची अंमलबजावणी करतांना कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाव्दारे वेळोवेळी निर्गमित केलेले कोविड-19 संबंधित आदेश व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.

Tags: AkolaAkola collectorCovidmasksNima Arora
Previous Post

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज (दि.29) 35 वा दीक्षांत सभारंभ

Next Post

Facebook चे नाव बदलले, आता ओळखले जाणार ‘या’ नावाने

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
facebook-android-log-in_1020.0

Facebook चे नाव बदलले, आता ओळखले जाणार 'या' नावाने

crime

कोपरगाव : चालकाचा मारहाणीमुळे मृत्यू; दोन स्थानिकांना अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.