अकोला: दि.27 : महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर ह्या गुरुवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 28 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय वाहनाने चिखली-अकोला-बोरगाव मंजु मार्गे डाबकी जहाँगीरकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता डाबकी जहाँगीर येथे आगमन व “स्त्रीधन शेळी वाटप योजना शुभारंभ” कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी पाच वाजता शासकीय वाहनाने डाबकी जहाँगीर-मुर्तिजापूर मार्गे अमरावती निवासस्थानकडे प्रयाण.