• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 21, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

विराट सेनेला लोळवले; त्यामुळे ‘हे’ समीकरण जुळल्यास दुबईतला वर्ल्डकप पाकिस्तानच्या नावावर!

Our Media by Our Media
October 25, 2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
131 1
0
pakistan- T20 World Cup
21
SHARES
946
VIEWS
FBWhatsappTelegram

टी-२० वर्ल्ड कपची (T-20 World Cup) रणधुमाळीला सुरु झाली आहे. प्रत्येक भारतीयासह काल भारतीय क्रिकेटच्या आणि वर्ल्डकपच्या इतिसाहात घोर निराशा झाली. ज्या पाकिस्तानला इतिहासाची साक्ष देऊन कमी लेखण्याचा प्रयत्न झाला त्यांनी तब्बल १० विकेटने भारताला लोळवत जबर दणका दिला. या महामुकाबल्यासाठी टीव्हीवाल्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत चांगलीच हवा निर्माण झाली आहे.

पाकिस्तानला संघात दादा संघाना हरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे या संघाकडे आणि पाच हुकमी खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. टी 20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान सर्वात धोकादायक मानला जात आहे. कारण युएईमधील खेळण्याचा अनुभव. विशेष म्हणजे याच पाच खेळाडूंनी काल दैना करून टाकली.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

पाकिस्तान 2009 टी-20 वर्ल्ड कपचा (T-20 World Cup) विजेता आहे. या संघाच्या नजरा आता दुसऱ्या टी-20 च्या विजेतेपदाकडे लागल्या आहेत. T-20 World Cup 2021 यावेळी यूएईमध्ये खेळला जात आहे. यूएई हे पाकिस्तान संघाचे दुसरे घर आहे. या ठिकाणी पाकिस्तानी खेळाडू खूप क्रिकेट खेळले आहेत. या T-20 World Cup मध्ये पाकिस्तान संघाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. जिथे न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तानचा सामना करेल.

स्टार फलंदाज बाबर आझम संघाचा कॅप्टन आहे. त्याने संयमाने शानदार फलंदाजी भारतीय गोलंदाजांची हवाच काढून टाकली. पाकिस्तानच्या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. वरिष्ठ खेळाडूंमध्ये शोएब मलिक, मोहम्मद हफीज यांचा समावेश आहे, तर शाहीन आफ्रिदी, हसनैन, हैदर अली या तरुण चेहऱ्यांकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे, पण पाकिस्तानमध्ये असे पाच खेळाडू आहे ज्यांची कामगिरी संघासाठी खूप महत्वाची असेल. जर हे पाच खेळाडू आपली भूमिका निभावण्यात यशस्वी झाले, तर पाकिस्तान दुसरे टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) विजेतेपदही उंचावू शकतो.

बाबर आझम

बाबर आझम तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे हे त्याने कालही दाखवून दिले. तो जागतिक टी-20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. बाबर आझम ही पाकिस्तानची सर्वात मोठी आशा आहे. यावेळी त्याला दोन मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. कर्णधार आणि फलंदाजी. त्याच्याकडे शोएब मलिक, सर्फराज आणि हाफिज कर्णधारपदासाठी मदत करतील. बाबरला फलंदाजीत आपली ताकद दाखवावी लागेल. मात्र, यंदा पाकिस्तानच्या कर्णधाराने चांगली कामगिरी केली आहे.

शाहीन शाह आफ्रिदी

गेल्या काही वर्षात बाबर आझमनंतर जर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने सर्वात जास्त सुधारणा केली असेल तर तो शाहीन शाह आफ्रिदी आहे. सामनावीर ठरलेल्या आफ्रिदीने काल जगातील सर्वांत धोकादायक समजली भारतीय फलंदाजांची फळीच कापून काढली. त्याने रोहित, राहुल आणि विराटला बाद करत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.

21 वर्षीय या वेगवान गोलंदाजाला विकेट कशी घ्यायची हे माहीत आहे. शाहीनला गती आहे. अचूक यॉर्कर आणि बाउंसर गोलंदाजी करायची ते माहित आहे. अलीकडील कामगिरी पाहता शाहीन शाह आफ्रिदीने राष्ट्रीय टी-20 चषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. केवळ सहा सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेतील तिसरा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता.

बाबर आझमने 14 टी-20 सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने 523 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. अलीकडेच राष्ट्रीय टी-20 चषकातही बाबर आझमची बॅट तळपली आहे. या घरगुती टी-20 स्पर्धेच्या सहा सामन्यांत त्याने 72 च्या सरासरीने 286 धावा केल्या. यापूर्वी पीएसएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्येच खेळला गेला होता. आणि बाबर आझम स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. (T-20 World Cup)

मोहम्मद रिझवान

मोहम्मद रिझवान अप्रतिम यष्टीरक्षक फलंदाज आहे. याची सुद्धा काल फलंदाजी भारतीयांनी पाहिली. जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे त्याची फलंदाजी पाहिली. पाकिस्तानमधील बाबरनंतर दुसरा सर्वांत विश्वासार्ह आणि हुशार फलंदाज म्हणून मोहम्मद रिझवानकडे पाहिले जाते. बाबर आझमसह डावाची तो सुरुवात करतो. यावर्षी रिझवानने टी-20 मध्ये सर्वाधिक धावाही केल्या आहेत. त्याने 14 टी 20 डावात 94 च्या सरासरीने 752 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतके समाविष्ट आहेत.

मोहम्मद हफीज

पाकिस्तानच्या फलंदाजीच्या फळीमध्ये आक्रमक फलंदाज मोहम्मद हफीज नसला, तरी मधल्या फळीत एक अनुभवी फलंदाज नक्कीच आहे. मधल्या षटकांत हाफिजला झटपट धावा कराव्या लागतील. यासोबत त्याला फिनिशरची भूमिकाही पार पाडावी लागेल. आसिफ अली किंवा मोहम्मद नवाज मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत. पण हाफिजइतके ते विश्वासार्ह नाहीत. मोहम्मद हाफिजला शेवटपर्यंत डाव कसा न्यायचा हे माहित आहे आणि त्याला कसे फिनीश करायचे हे देखील माहीत आहे. त्याची सध्या स्ट्राइक रेट आणि फॉर्म ही एकमेव समस्या आहे. (T-20 World Cup)

हसन अली

2021 साल हसन अलीसाठी खूप चांगले ठरले असून तो मस्त फॉर्ममध्ये आहे. कसोटीत धमाका केल्यानंतर तो टी-20 मध्येही चमकला. या वर्षी 10 डावांमध्ये हसन अलीने 15 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय हसन अलीनेही फलंदाजीला हातभार लावला आहे. सात डावांमध्ये 58 धावा आणि 207 चा स्ट्राईक रेट. यामुळेच बाबर आझमने डेथ ओव्हर्समध्ये हसन अलीला वरती पाठवायला सुरुवात केली आहे. जेणेकरून तो काही मोठे फटके मारून धावा करू शकेल.

हसन अली पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल. त्याला यूएईमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. आतापर्यंत दुबई आणि अबू धाबीच्या खेळपट्टीवर त्याने एकूण 15 टी-20 विकेट घेतल्या आहेत.

Tags: IndiaPakistanRohit Sharmavirat kolhi
Previous Post

जांभा बु.च्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा- पालकमंत्री बच्चू कडू

Next Post

Mumbai Drugs Case: समीर वानखेडे यांची होणार खात्‍यांतर्गत चौकशी

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
जाहीर
Featured

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर.! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत

February 22, 2024
अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा
Featured

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

February 22, 2024
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
Featured

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

January 12, 2024
Featured

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 5, 2024
Next Post
samir wankhede

Mumbai Drugs Case: समीर वानखेडे यांची होणार खात्‍यांतर्गत चौकशी

nima arora collector jilhadhikari akola

कोविड निर्बंध; हॉटेल्स रेस्टॉरंट्स, दुकानांसाठी नियमावली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.