• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बायोडिजेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री: अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Our Media by Our Media
October 21, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
208 2
0
nima arora collector jilhadhikari akola
31
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२१ : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बायोडिजेल या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे इंडस्ट्रियल ऑईल वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यास शासनाची परवानगी नसून, असे अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसीएशन अकोला यांनी निवेदन देऊन जिल्ह्यात अवैध बायोडिझेलची विक्री होत असल्याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार तहसिलदार, निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, निरीक्षक (वैधमापन) यांचे तालुकानिहाय पथक स्थापन करून काही बायोडिजेल विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली व नमुन्यांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार, तपासण्यात आलेला नमुना बायोडिझेल नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बायोडिझेल विक्री केंद्रावरून कोणतीही व्यक्ती वाहनांना थेट इंधन म्हणुन बायोडिझेलची विक्री करता येणार नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बायोडिझेल विक्री परवान्याकरिता १२ प्रकारचे परवाने व दाखले (ना हरकत प्रमाणपत्रे) आवश्यक आहेत. ते याप्रमाणे- जिल्हा दंडाधिकारी/ जिल्हा आयुक्त यांचे प्रमापणपत्र , पेट्रोलियम विस्फोटक संघटना यांचा परवाना, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाकडुन ना हरकत प्रमाणपत्र, जीएसटी रजिस्टेशन, वैधमापन विभागाचे प्रमाणपत्र , राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र , दुकाने व आस्थापना विभागाचे नोंदणी पत्र , जमिनीचे वाणिज्यिक वापर संबंधी जिल्हाप्रशासनाकडुन मान्यता.

राज्यात बायोडिझेल विकीबाबत राज्याचे बायोडिझेल (उत्पादन ,साठवणुक पुरवठा व विक्री) धोरण २०२१ हे दि. ११ मे २०२१ रोजी शासनाने निश्चित केलेले आहे. या धोरणान्वये वरील १२ प्रकारचे दाखले- प्रमाणपत्र आवश्यक आहेत. त्याशिवाय बायोडिझेल ची विक्री करता येणार नाही असे, शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

तसेच औद्योगिक वापराकरिता इंधन (Industrial Oil) असे फलक लावुन अवैध विक्री केंद्र सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. तथापि,बायोडिझेल नावाखाली इंडस्ट्रियल ऑईल (औद्योगिक उपकरणाकरिता उपयोगी असलेल्या उत्पादन)चा वाहनामध्ये उपयोग करू नये. इंडस्ट्रियल ऑईल हे कोणत्याही वाहनाकरिता इंधन म्हणुन वापर करण्यास शासनाची परवानगी नाही. त्यामुळे हे तेल वाहनाकरिता इंधन म्हणुन अधिकृत नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अनाधिकृत बायोडिझेल केंद्र चालवत असल्याचे आढळुन आल्यास तशी तक्रार संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात येथे करावी. या तक्रारीच्या चौकशीअंती तथ्य आढळल्यास किंवा तसे निष्पन्न झाल्यास संबंधिताविरूध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले. बायोडिजेलची अवैध विक्री करतांना कोणतीही व्यक्ती आढळुन आल्यास अशा व्यक्ती विरुद्ध जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ , ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले आहेत.

Tags: biodieselNima Arora
Previous Post

Dearness Allowance: केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ

Next Post

‘मिशन वात्सल्य’ अकोला तालुका आढावा बैठक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Mission Vatsalya

‘मिशन वात्सल्य’ अकोला तालुका आढावा बैठक

nima arora

रास्तभाव दुकानांवर लसीकरणानुसार प्राधान्यक्रम- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.