अकोला: दि.20: वाहन चालक पोलीस भरती प्रक्रियाकरीता उमेदवारांची निवड चाचणी शुक्रवार दि. 22 ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेकरीता उपप्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षकांची निवड चाचणीकरीता नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पातूर तालुक्यातील शुक्रवार दि. 22 रोजी जनतेच्या सोयीकरीता आयोजीत करण्यात आलेले शिबीर रद्द करण्यात आले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.