तेल्हारा : कोवीड 19 चा धोका लक्षात घेता तेल्हारा येथे अत्यंत साधे पणाने ईद साजरी करण्यात आली. यावेळी जामा मस्जिद येथे ईद मिलादन्नबी जुलुस कमेटी तेल्हारा व ग्रामीण रुग्णालय तेल्हारा च्या सयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले यावेळी 175 जणास कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
लसीकरण कामी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक तापडीया वैद्यकीय अधिकारी डॉ.. सदिप इंगळे, डॉ. राहुल सदाफळे डॉ. अंजली सदाफळे परिचारिका ज्योती डेरे, सौ. चिचोळकर विशाखा सिरसाट संगीता माहोरे प्रभा तायडे रोषन पाथीकर याचे यावेळी योगदान लाभले या प्रसंगी ईद मिलादन्नबी जुलुस कमेटी तेल्हारा चे पदाधिकारी कार्यकते विविध सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षाचे मंडळाचे कार्यकर्ते पत्रकार याची उपस्थित होती. उपस्थितानी ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या लसीकरणाचा लाभ हिन्दू व मुस्लिम महिला पूरूषानी घेतला.