• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हाधिकारी यांचे आदेश; मार्गदर्शक सूचना जारी; ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा

Our Media by Our Media
October 19, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
83 1
0
nima arora collector jilhadhikari akola
13
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.19: कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेवून या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस मंगळवार/बुधवार दि. 19 किंवा 20 रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) साध्या पध्दतीने व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

  1. कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रकनुसार ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
  2. शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद-ए-मिलाद शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. तथापि मिरवणूका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणूकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच इसमांस परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणूकादरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.
  3. मिरवणूकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनी प्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
  4. मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधीत महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहीत नियमांचे पालन करावे.
  5. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
  6. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टि.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.
  7. ई-ए-मिलाद निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील लावण्यात येतात. सबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील च्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
  8. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.
  9. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.
  10. या सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाला असतील.
  11. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
Tags: Eid-e-MiladNima Arora
Previous Post

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण

Next Post

राज्यातील उपहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

राज्यातील उपहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार

Supreme-Court

आर्यन खानसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात; 'एसीबी' कडून मूलभूत अधिकारांचे हनन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.