मूर्तिजापूर- यंदा आलेल्या पावसाने राज्यातील अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान केलेच. तोंडी आलेल्या घास हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथील शेतकरी दाम्पत्याने कर्जाचा डोंगर वाढल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली या दोघांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच पतीचा मृत्यू झाला, तर पत्नीवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहे.
मधापुरी येथील शेतकरी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक मोहन च र्जन वय 45 पत्नी रेश्मा दीपक च र्जन वय 40 हे दाम्पत्य दोन मुले अथर्व वय 15 ऋवेद 10 कुटुंबासह आनंदाने राहत होते. शेतकरी दीपक चर्जन यांच्याकडे दोन एकर शेती असून त्या भरोशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु दरवर्षी होत असलेल्या सतत च्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे दोघेही त्रस्त होते. यावर्षी मुसळधार पावसामुळे पेरलेली शेती वाहून गेली.
त्यामुळे खाजगी कर्ज असल्याचे समजते यामुळे कुटुंबावर उपासमारी सारखे संकट आले. त्यामुळे आता कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचा दुसरा मार्ग नसल्यामुळे पती व पत्नी दोघांनी शनिवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घरात ठेवलेले विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नातेवाईकांनी व शेजाऱ्यांच्या मदतीने शेतकरी दीपक चर्जन व पत्नी रेश्मा या दाम्पत्याला खाजगी वाहनाने उपचाराकरिता अमरावती येथील जिल्हा शासकीय इरविन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.