अकोला: अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या डॉ अनंता शेवाळे यांचे हॉस्पिटल कायमस्वरूपी सिल करा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांना निवेदन देऊन केली. शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉ. शेवाळे याने एका रुग्णास सोबत अनैसर्गिक संभोग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉ. शेवाळे यास अटक केली आहे.
सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला पीडित इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे मित्र व ते डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे 41 रा. संभाजीनगर यांच्याकडे उपचाराकरीता गेले होते. आरोपी डॉक्टरांनी त्यांच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध साधले. तसेच त्यांना वारंवार फोन करून त्रास देत होते.
त्यानुषंगाने डॉक्टरच्या कुकृत्याचे स्टिंग ऑपरेशन करावे म्हणून फिर्यादीने डॉक्टरांकडे उपचाराकरता गेले असता डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे याने जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराची व्हिडिओ चित्रण करण्यात आले असून सिव्हिल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे रा. संभाजी नगर याला अटक केली. असून डॉक्टरी पेशाला कलंक लावणाऱ्या शेवाळेचे हॉस्पिटल कायमस्वरूपी सिल करण्यात यावे, व त्यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे साहेब यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना बाळापूर तालुका अध्यक्ष तथा अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके, मनिष भाऊ तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपला नम्र
उमेश सुरेशराव इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला)