तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण येथे ऑक्सिजन कॉन्स्टेनट्रेटर लोकार्पण सोहळा व कोविड योद्धाचा सत्कार सोहळा 12 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असतांना देशामध्ये ऑक्सिजन चा तुटवळा निर्माण झाला होता. अश्यात ग्रामीण भागातील रुग्णांना खूप मोठ्या समश्याना सामोरे जावे लागत होते. पंचगव्हान गावा मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध नव्हती. गावात ऑक्सिजन ची सुविधा पुरवण्यात यावी या करिता सौरभ वाघोडे यांनी शेतकरी जागर मंच चे संयोजक प्रशांत गावंडे यांची भेट घेऊन गावातील प्रश्न सांगितला असता त्यानी दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले.
या सोहळ्याला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम फाउंडेशन व शेतकरी जागर मंच यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सोयीकरिता दोन ऑक्सिजन कॉन्स्टेनट्रेटर येथील आरोग्य केंद्राला भेट देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मल्ल, डॉ. निलेश अंबरते, डॉ. एस के हकीम, डॉ. मोहम्मद साजिद व आरोग्य केंद्राचा संपूर्ण कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैफुल्ला खा ऐसान खा होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी जागर मंच चे संयोजक प्रशांत गावंडे, डॉ. अमोल रावणकर, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संजीवनीताई बिहाडे, तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड, प्रथम फाऊंडेशनचे प्रमुख पंकज धुमाळे,रवी अरबट उपस्थित होते. तर कार्यक्रमाला पं. स सदस्य आम्रपाली गवारगुरू, तिन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, गावातील व बाहेर गावातील नागरिक, सर्वत्र कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सौरव वाघोडे यांनी केले तर सुत्रसंचालन सचिन माहोकार यांनी केले आभार डॉ. काळे यांनी मानले.