अकोला: दि.13 : बार्शिटाकळी जि. अकोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नविन इमारतीचे लोकार्पण रविवार दि. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उच्च न्यायालय मुंबई व नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर व अकोला जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.